भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, रावेर पोलिसात गुन्हा दाखल

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अल्पवयीन मुलीला पाल येथे निर्जंनस्थळी पळवून नेत आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की,पाल येथील निर्जंनस्थळी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत आरोपींनी बलात्कार केला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारणा झाली तेव्हा, तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान, पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले व डांबून ठेवत वारंवार बलात्कार केला असे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवि छपरीबंदची पत्नी आणि धीरज,सर्व. रा. रावेर यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!