आ. शिरीष चौधरी यांचा विश्वास सार्थ ठरवणार – विवेक ठाकरे
निंभोरा बुद्रुक.ता. रावेर, प्रा.दिलीप एस सोनवणे।
रावेर-यावल तालुक्यात कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विषयांचे व्यावसायिक तसेच व्यवस्थापकीय शिक्षणाचे दर्जेदार काम उभे राहावे म्हणून आ.शिरीषदादा चौधरी यांनी केलेली निवड सार्थ ठरवत मधुस्नेह संस्था परिवाराचे झोकून काम करणार असल्याचे सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस व मधुस्नेह संस्था परिवाराचे नवनियुक्त समन्वयक विवेक ठाकरे यांनी नमूद केले.
निंभोरा ग्रामपंचायतीतर्फे आयोजित सत्कार प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य डीगंबर चौधरी हे होते. प्रारंभी मधूस्नेह संस्था परिवारात समन्वयकपदी विवेक ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल निंभोरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सचिन महाले, सदस्य डीगंबर चौधरी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचा सत्कार केला. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. ललित कोळंबे सर, भास्कर महाले, राजीव बोरसे, सुनील कोंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद खान, मनोहर तायडे ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, अतुल पाटील यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विवरा येथील सरपंच युनूस तडवी, निंभोरासिम येथील सरपंच अनिल कोळी, उपसरपंच उमेश वरणकर, बलवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाजन, वाय.डी.पाटील, भाग्यश्री ठाकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, दस्तगीर खाटीक, सौ.मंदाकिनी बऱ्हाटे, मधुकर बिऱ्हाडे, अमोल खाचणे, विकी खाचणे, मुजफ्फर पटेल, राहुल लोखंडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विजय रल, सुरज नरवाडे, गुरुदास बऱ्हाटे, इमरान पटेल, शकील खाटीक विशाल तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी निलेश भंगाळे, राहुल महाले, विनोद गोराडकर यांनी परिश्रम घेतले.