खिर्डी येथील काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरु
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील बाजार पेठ परिसरातून बलवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे १०० मीटर काँक्रीटीकरणचे एक साईड चे काम गेल्या कित्येक दिवसापासून रखडले होते.तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने तसेच संबंधित ठेकेदाराने तयार झालेल्या रस्त्याच्या तोंडावर मधोमध वाळूचा ढीग टाकला होता त्यामुळे वाहन धारकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता.
तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे डबके तयार झाले असता चिखलामुळे अनेकवेळा मोटर सायकल स्लीप होवून किरकोळ अपघात घडत असत.तसेच येथील रहिवाशांना डासांचा खूप त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे त्रस्त लोकांची आणि वाहन धारकांची एकच ओरड असल्याने या बाबत ” मंडे टू मंडे न्यूज” ने १० जुलै रोजी खिर्डी येथे रस्त्यातच चिखल युक्त घाणपाणी,रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे ग्रामस्थ त्रस्त.या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाच्या वरिष्ठअधिकाऱ्यांनी ठेकेदारास अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आली .या मुळे संबंधित ठेकेदाराने दि.१६ जुलै रोजी खड्डे बुजवून आज पासून काँक्रीटीकरण चे काम मार्गी लागले असल्यामुळे रहदारीचा प्रश्न कायमचा मिटला आहे.अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.