निंभोरा पोलीसस्टेशन तर्फे तांदलवाडी विद्यालयात विद्यार्थ्यांना समुपदेशन
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी।। येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता ७ वी ते १० वी तील विध्यार्थ्यांना समुपदेशन पर मार्गदर्शन निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी केले.
प्रथम कारगिल दिवसाची आठवण काढत शहीद झालेल्या योध्यांना श्रद्धांजली वाहिली नंतर शासन आदेशानुसार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विद्यालयात शाळेतील विध्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जायचे ते त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन होणारे अत्याचार, कमी वयात लागणारी व्यसने व त्याला बळी पडणारे तरुण,आजकाल चे सर्वात धोकादायक व्यसन म्हणजे मोबाईल चा अति प्रमाणात होणारा वापर व त्यातून उद्भवणारे विकार आणि इंटरनेट शी संबधित गुन्हे याविषयीची सखोल माहिती दिली.इंटरनेट शी संबधित अनेक गुन्हे मी पाहिले आहेत आपण मोबाईल आणि इंटरनेट चा उपयोग चांगल्या ज्ञाना साठी करावा. शाळेत पिंक बॉक्स ठेवनार असून त्यात मुले आपापल्या तक्रारी विना संकोच टाकू शकनार आहेत असे त्यांनी सांगितले. जीवनात अभ्यासाशिवाय पर्याय नाही मी सुद्धा साधारण घरातुन आलो आहे जेमतेम परिस्थिती मध्ये एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून फक्त आणि फक्त अभ्यास करूनच ह्या पदापर्यंत पोहचलो.आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कल्पनेने रंगविलेल्या विश्वाकडे न जाता वर्तमान जीवनाकडे लक्ष देने गरजेचे आहे असे सांगून त्यांनी विध्यार्थ्यांना नवी प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के.जी.महाजन, व्हा.चेअरमन मुकेश पाटील,संचालक किशोर पाटील,अमोल महाजन, मुख्याध्यापक ए. आर. चौधरी,पर्यवेक्षक एस.आर.पाटील,बी एम पाटील,संदीप पाटील,के. एम. पाटील,जे. एफ.जमरा, पी. एल. पाटील,विपुल पाटील सर, ए.के.पाटील मॅडम,व्ही.डी.पाटील मॅडम, एस.एस,महाजन, यु.ए.चौधरी सर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्र संचालन ए.बी.पाटील मॅडम यांनी केले