भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

लंपी आजाराने गाय दगावली, ऐनपूर येथे पशुपालकांमध्ये भीती

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। अनेक दिवसांपासून संपुर्ण जळगाव जिल्ह्यात लंपी या आजारामुळे गाय, बैल याचे मृत्यु होत आहेत, यामुळे संपुर्ण जिल्ह्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत, ऐनपुर येथे दि (५/११/२२) रोजी शेतकरी प्रभाकर भिका पाटील यांची गाय उपचारा अंती लंपी या आजाराने मृत्यू झाली, शासनाने यावर लस उपलब्ध केली असली तरीही गुरांचे मृत्यू होत आहेत,यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार ऐनपूर येथील शेतकरी प्रभाकर भिका पाटील यांची मालकीच्या गाईला /२७ ऑक्टोबर रोजी लंपी हा रोग झाल होता गेली दहा दिवसांपासून गाईवर उपचार सुरू होते पंरतु दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सदर गाईने औषध उपचारला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे उपचाराअंती त्या गाईचा मृत्यू झाला असी माहिती पशु वैद्यकीय कार्यालयातील कर्मचारी इंगळे यांनी दिली, सदर लंपीग्रस्त गाईचा उपचार ऐनपुर येथील पशु वैद्यकीय डॉ. अभिजित डावरे व नेमाडे यांनी केला, सदर घटनेने पशु पालका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,मृत गाईचा पंचनामा करून शेतकरी याना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा करण्याचे पशु वैधकीय कार्यालयाकडुन सागण्यात आले , तसेच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात लंपी आजाराने डोके वर काढले आहे,शासनाकडुन लंपी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे परंतु तरीही लंपी आजारांवर आळा घालण्यासाठी आज पर्यत शासनला पाहिजे तसे यश आले . नाही शासनासमोर लंपी आजार हा एक आव्हाण ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!