विवरे खु.येथे चोरट्यांनी केली गाय चोरी
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील विवरे खु. येथील रहिवाशी जितेंद्र भास्कर गाढे यांच्या मालकीची अंदाजे २० हजार रु किंमतीची गाय बसस्थानक परिसरात बांधलेली असतांना रात्री १ते २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.या बाबत जितेंद्र गाढे यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याप्रमाणे भांदवी ३७९ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंभोरा पोलिस स्टे.चे सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एफएसआय रा.का.पाटील, हेकॉ.विकास कोल्हे हे करीत आहे.तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.