खिर्डी येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान तर्फे दहीहंडी उत्सव साजरा
खिर्डी ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील भाविकांचे श्रध्दास्थान व पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेले श्रीकृष्ण मंदिर संस्थान तर्फे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.विशेष मिरवणुकीचे आकर्षण गारबर्डी येथील आदिवासी पारंपरिक नृत्य व खिर्डी येथील प्रमुख आकर्षण असलेले ३० वाजंत्री मंडळीच्या ढोल ताशा पथकाच्या गजरात भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची भव्य अशी पालखी द्वारे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते हरलाल भाऊ कोळी,दीपक पाटील, निंभोरा पोलिस स्टे.चे एपीआय गणेश जी धुमाळ, पीएसआय काशिनाथ कोळंबे पो.काॅ प्रदीप पाटील,समस्त ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.तसेच श्रीकृष्ण मंदिर संस्थान चे आचार्य चोरमागे बाबाजी महानुभाव, कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप महाराज पंजाबी यांनी मंदिर परिसरात आज संध्याकाळी ६:३० वा.मि ला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता गोविंदा पथकांनी या मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होवून जगदंब ग्रुप यांनी या वर्षी सार्वजनिक दहीहंडी फोडण्याचा मान पटकवून त्यांना शाल श्रीफळ पाचशे रू रोख आणि हिमरू शाल देवून त्यांचा श्रीकृष्ण मंदिर संस्थान तर्फे गौरव करण्यात आला.