खिर्डी परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी परिसरात १८ मार्च २३ शनिवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने केळी,मका,गहू हरभरा,यांसह लिंबू व टरबूज या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी राजा पुरता आर्थिक संकटात सापडला आहे.
तसेच शेत शिवारात मोठ्या प्रमाणात विजेच्या तारा तुटल्यामुळे व ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेमुळे वीज पुरवठा ठप्प झाला असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी देणे आवश्यक असून शेतकऱ्यांना आस्मानी आणि सुलतानी संकटांचा दुहेरी सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.हीच परिस्थिती रावेर-यावल तालुक्यात सर्वत्र पहायला मिळत असल्याने शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी.