भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपुर गावात अंधार,महावितरणच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडीत!

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पथदिव्यांची बिले थकल्यामुळे महावितरण कंपनीने ऐनपुर गावाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने संपूर्ण गावात अंधार पसरला आहे वीज पुरवठा खंडित केल्याने गाव पाण्यापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शासनाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी बिले भरावी असा आदेश काढून ग्रामपंचायतींनपुढे मोठा पेच प्रसंग उभा केला आहे ऐनपुर येथील पथदिव्यांची बिले गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद मार्फत भरली जात होती परंतु शासनाने काढलेल्या नविन अध्यादेशानुसार ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांची येणारी वीज बिलाची देयके ग्रामपंचायतने त्यांना वर्ग झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावी असे निर्देशित केले आहे ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती बेताची आहे दैनंदिन खर्च करतांना ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरं जावं लागतं असताना त्या त नागरीकना आव्हाण करण्यात येत की जाच्याकडे थकबाकी असेल त्यांनी थकबाकी भरावी असे ग्राम पंचायत कडून आव्हान करण्यात येत आहे.

संपुर्णग्राम पंचायतीचा कारभार ग्राम निधी वर चालतो त्या क्रमचाऱ्याचे पगार पाणी पुरवठ्यावर वीज बिलावर आणि इतर खर्च केला जातो त्यामुळे निधी शिल्लक कसा राहाणार त्यामुळे ग्राम पंचायतची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यात शासनाने वीज बिलाचा चेंडू ग्रामपंचायत च्या कोर्टात टाकून आपले हात झटकले आहे महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे कनेक्शन बंद केल्यामुळे ऐनपुर गावात अंधार पसरला आहे दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे ग्रामपंचायत चे उत्पन्न घटले आहे ग्रामपंचायतने ही वीज बिले भरली तर ग्रामविकासासाठी निधी शिल्लक कसा राहणार असे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे म्हणणे आहे शासनाने त्वरित पूर्वी प्रमाणे जिल्हा परिषद मार्फत वीज बिले भरून ऐनपुर गावातील अंधार दूर करावा अशी मागणी ऐनपुर येथील नागरिकांकडून होत आहे गावात पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे रात्रीच्या वेळेस यामुळे चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!