भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

दसनुर, निंभोरा बनले गुटखा तस्करीचे केंद्र, परिसरात केली जाते गुटख्याची विक्री

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अन्न प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरी मुळे रावेर तालुक्यातील दसनुर व निंभोरा येथून तंबाखूजन्य गुटखा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोहचवला जातो. येणाऱ्या भावी पिढीच्या आरोग्याशी खेळला जाणार हा खेळ असल्याचे चित्र आहे.

रावेर तालुक्यातील दसनुर येथे विठ्ठल मंदिर परिसरात पाण्याच्या टाकी जवळ गुटखा तस्करीचे मोठे केंद्र असून येथून दररोज लाखो रुपयांच्या तंबाखू जन्य गुटख्याची परिसरातील गावांमध्ये तस्करी केली जाते. मंदिराजवळ परिसरात राज्यात विक्रीस व बाळगण्यास बंदी असलेल्या आरोग्यास अपायकारक असलेला तंबाखूजन्य गुटखा मोठ्या प्रमाणावर विकला जात असून लहान मुले सुद्धा व्यसनाधीन झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

त्याचप्रमाणे जवळच असलेल्या रावेर तालुक्यातीलच निंभोरा येथील बसस्थानक परिसरात एका दुकानात दुकानाच्या नावाखाली खुलेआम गुटख्याची तस्करी व विक्री केली जात असून निंभोरा परिसरातील गावांमध्ये चारचाकी गाडीतून पोहोच केली जाते, या परिसरात मध्यप्रदेश -बऱ्हाणपूर येथून चारचाकी गाडीतून खुलेआम गुटखा आणला जात असून याच गाडीतून सर्वत्र आजूबाजूच्या खेड्यांवर गुटख्याची पोहोच करून विक्री केला जातो. यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही , पुरुषांच्या सोबत आता तरुण मुलेही गुटख्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.इतकेच नव्हे तर यात महिलांचे प्रमाण सुद्धा मोठ्याप्रमाणावर असल्याचीही माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!