रावेर तालुक्यातील खिर्डी येथे चितळाचा मृत्यू
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे पहाटेच्या सुमारास साधारणतः अकरा ते बारा वर्षे वयाचे नर चितळ मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे हा मृत्यू झालेला चितळ लोकवस्ती रहदारी भागात सापडला.
या बाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक ऐनपुर रोड लागत नर प्रजातीतील चितळ याचा मृतदेह आढळून आल्याने हा चितळ रहदारी भागात कसा आला ? या बाबत अनेक चर्चा असून रात्री कुत्र्यांनी त्याचे लचके तोडल्याचे दिसत असून त्याची शेपटीही गायब आहे. सि सि टीव्ही कॅमेऱ्यातही हे दिसत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पांचनामा केला. या वेळी पाल येथील वनपाल डी.जे. रायसिंग, रावेर वनपाल रवी सोनावणे, वनपाल राजेंद्र सलदार, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास रावेर परिक्षेत्र अधिकारी अजय बावने हे करित आहेत.