तांदलवाडी बलवाडी रस्त्यावरील पुलाच्या भरावाला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी.
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भवन आणी विटभट्टी जवळ असलेल्या तांदलवाडी बलवाडी या रस्त्यावर गेल्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी नव्याने दोन पूल बांधण्यात आले आहेत.तसेच दोन्ही पुलांच्या बाजूला वाहतूक सुरळीत करण्यासाठी पिवळ्या मातीचा वापर करून भराव टाकण्यात आला.
सदरील पुलाचा भराव टिकून राहण्यासाठी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असताना केवळ मातीचा भराव टाकून काम आटोपते घेतले असून जुजबी काम करून आपली जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तसेच सदरील रस्ता नागपूर हायवेला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून शेकडो वाहने नेहमी ये जा करत असतात.सदरील पुलाचा मातीचा भराव संरक्षक भिंत अभावी खचत आहे.तसेच पुलाच्या भरावाच्या दोन्ही बाजूस खड्डे पडत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.तसेच एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी परिसरातील वाहनधारकांसह ग्रामस्थांनी केली आहे.