भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून बदनामीची धमकी देत पंधरा लाखाची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत प्रेमाची मागणी करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली.इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलीच्या वडिलांना शिवीगाळ व दमबाजी करत १५ लाख रुपयांची मागणी करुन पैसे न दिल्यास मुलीची बदनामी करू अशी धमकी दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची अल्पवयीन मुलगी हिला जयेश मोतीलाल सपकाळे,रा. आदर्श नगर, रावेर, याने मुलीला प्रेमाची मागणी करुन वाईट उद्देशाने तिचा वेळोवेळी पाठलाग केला. मुलीने नकार दिल्याने अमोल इंगळे रा. अष्टविनायक नगर रावेर व गणेश विश्वनाथ भावसार,रा. अफूगल्ली ता. रावेर,या दोघांनी जयेश सपकाळे याला साथ देऊन तिघांनी संगनमताने शिवीगाळ, दमबाजी करुन सदरचे प्रकरण मिटविण्यासाठी दिनेश चौधरी यांना १५ लाख रुपयांची मागणी करुन पैसे न दिल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे व दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!