आदिवासी कोळी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणाचा निर्धार
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथे होऊ घातलेल्या आदिवासी कोळी समाजाच्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण रावेर तालुका मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी रावेर तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले,
दि.७/१०/२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर येथे मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली. जितेंद्र सर, संजय कांडेलकर ,किरण कोळी, खेमचंद कोळी, नामदेव कोळी, बंडू कोळी, हरिलाल कोळी,मनोहर कोळी,नारायण कोळी, चंद्रकांत कोळी, सुभाष सपकाळे सर, विजय कोळी, ईश्वर तायडे ,नितीन कोळी ,विनोद कोळी (शिवा भाईG) , किशोर तायडे , पंढरी कोळी , विजय कोळी नेहता, किशोर कोळी निंबोल , अशोक सपकाळे , रविद्र सोनवणे , सुपडु मोरे , उमेश कोळी , रविंद्र महाले, जयराम कोळी , धिरज जैतकर , दिपक कोळी, प्रविण जैतकर , रोशन जैतकर, बादशाह जैतकर , ईश्वर कोळी , पंडीत कोळी , सचिन महाले, राजेन्द्र महाले, योगेश्वर कोळी, भागवत कोळी , राहुल कोळी, मकुदा तायडे, संदिप महाले , सुनिल कोळी, गोपाल कोळी ‘ विनायक कोळी रावेर,विनोद कोळी निबोल तालुक्यातील सर्व संघटनाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी १ .सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे, २. जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी, ३.इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर कोळी यांनी केले.