क्राईमरावेर

घृणास्पद ; नराधम बापाचा पोटच्या मुलींवरच अत्याचार, सावदा पोलिसात गुन्हा दाखल

सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।   सख्ख्या नराधम बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रावेर तालुक्यातील चिनावल येथे घडली.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील १३ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहत असता, दि २१ मे रोजी मुलीची आई  नेहमी प्रमाणे सकाळी कामावर निघून गेली असता सकाळीच ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मुलगी  घरात भांडी घासत असतांना नराधम बापाने मुलीस  बळजबरीने ओढून घरात नेत  मुलीवर अत्याचार केला. पिडीत मुलीने आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारऱ्यांनी घरात धाव घेत पिडीत मुलीची नराधम बापापासून सुटका केली. व  त्याला चोप सुद्धा दिला. या वेळी  नराधम बापाने घटनास्थळावरून पळ काढला. नराधम बाप फरार असून या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसस्टेशनला नराधम बापाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!