भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेरसामाजिक

सावदा येथे रावेर विधी सेवा समिती आयोजित लोक-अदालतीत २३ केसेस चा निपटारा

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज दि. १३/०६/२०२२ सोमवार रोजी शासकीय विश्राम गृह सावदा येथे तालुका विधी सेवा समिती,रावेर मार्फत बाल कामगार व मोटार वाहन कायदा या विषयांवर कायदेविषयक शिबीर तसेच मोबाइल व्हॅन फिरते लोक-अदालतीचे आयोजन करण्यात आले. सादर लोकदलातीत १३८ ची २ केसेस मोटार वाहन कायद्या अंतर्गत एकूण १८ केसेस तसेच कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत ३ केसेस चा निपटारा करण्यात आला. त्यातून एकूण १००००/- रुपयांचा दंडाची वसुली करण्यात आली.

शिबिराचे अध्यक्ष मा.न्या. श्री.प्रवीण पी. यादव साहेब होते. तसेच शिबिराला रावेर तालुक्याचे गट विकास अधिकारी सौ. दिपाली कोतवाल उपस्थित होत्या. शिबिराचे सूत्रसंचालन Adv.शीतलकुमार जोशी, अनुमोदन Adv.प्रमोद विचवे, कार्यक्रमाची रूपरेषा Adv.एस. बी. सांगळे, मोटार वाहन कायद्यावर Adv.प्रमोद विचवे यांनी मार्गदर्शन केले तसेच बालकामगार या विषयावर Adv.श्री.धनराज ई. पाटील यांनी मार्गदर्शन केले. फिरते लोक-अदालतीचे पंच न्यायाधीश म्हणून मा.न्या. श्री.प्रवीण पी. यादव तसेच पंच सदस्य म्हणून Adv.श्री.मेघनाथ चौधरी हे होते.


सादर शिबीर व लोकअदालती साठी सावदा पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी डी. डी. इंगोले तसेच समाधान गायकवाड रावेर वकील संघाचे अध्यक्ष Adv.एस. बी. सांगळे, सचिव Adv. प्रमोद विचवे, उपाध्यक्ष Adv.शीतलकुमार जोशी, Adv.धनराज ई. पाटील,Adv. राकेश पाटील, Adv.श्री.संदीप मेढे,Adv.श्री.एस. एम. सोनार, Adv.श्री.तुषार पी. चौधरी, PLV सौ.सुनीता दरेकर, सौ.वर्षा पाटील, दयाराम नामदेव मानकरे, श्री. बाळकृष्ण पाटील, श्री.राजेंद्र अटकाळे, न्यायालयीन कर्मचारी सहा.अधि.श्री.सुगंधिवाले,स्टेनो मनोहर शिंपी, लिपिक डी. जी. इंगळे, बी. के. तडवी, राहुल सोनावणे, श्री.भरत बारी, दिनेश साळी, भगवान पाटील, सतिष रावते, किशोर तुळशीराम पाटील इ. चा सहभाग आणि सहकार्य लाभले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!