दसनुर येथील उमेश्वर महादेव मंदिरात आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दसनुर येथील उमेश्वर महादेव मंदिर पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या मंदिरांपैकी एक असून या मंदिराची फार जुनी आख्यायिका आहे.दि.१० जुलै रविवार रोजी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
येथील महादेव पिंड हे स्वयंभू असून इथे पंचक्रोशीतील भाविकांची नेहमीच मांदियाळी असते.तसेच या ठिकाणी दरवर्षा प्रमाणेच आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण गावातील येणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले आहे.तसेच येथे श्रावण महिन्यात आगळे वेगळे कार्यक्रम राबविले जातात.