सावदा येथे “आनंदाचा शिधा” वाटपाला सुरुवात
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा येथे राज्य सरकार तर्फे “आनंदाचा शिधा” वाटप कार्यक्रम सम्पन्न झाला. भाजप -शिवसेना सरकार कडून रेशन धारकास चणाडाळ, तेल, साखर व रवा प्रत्येकी एक किलो प्रमाणे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. स्वस्त धान्य दुकानदार श्री संतोष चौधरी यांच्या वार्ड केंद्रावर शिधा वाटप करण्यात आले.
या वेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.अरविंद झेंडू वंजारी, जे.के.भारंबे शहराध्यक्ष, संतोष परदेशी, महेश अकोले सरचिटणीस, मा.नगरसेवक भानुदास भारंबे, दिलीप चांदेलकर, शिवाजी भारंबे, लतेश सरोदे, महेश बेदरकर, सागर चौधरी, अतुल चौधरी, अक्षय सरोदे, पंकज जोगी, प्रतिक परदेशी यासह कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी, हजर होते.