भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा येथील आ.गं.हायस्कूल व ना.गो.पाटील महाविद्यालयात “लाही” संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। व्यवसाय शिक्षणाच्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रिया सुलभ व वेगवान व्हावी, यासाठी “लाही” ( लेड ए हॅण्ड इन इंडिया) या संस्थेमार्फत सावदा येथील आ.गं.हायस्कूल व ना.गो.पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लिनोवो कंपनीचे 16 हजार रुपये किमतीचे टॅबची वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी किशोर चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते.

मुंबईवरून श्रीमती ऋतिका या लाहीच्या प्रमुख प्रतिनिधी व प्रकाश पाटील लाही चे समन्वयक हे उपस्थित होते. याप्रसंगी ऑटोमोबाईल व मल्टी स्किल या शाखांचे एकूण 33 विद्यार्थ्यांना टॅबची वाटप करण्यात आली. अनपेक्षितपणे मिळालेली भेट विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ठरली. याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता . विद्यार्थ्यांनी या टॅबचा वापर शैक्षणिक प्रक्रिया समृद्ध करण्यासाठी करावा. असे आव्हान मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

तसेच मुख्याध्यापक श्री सी सी सपकाळे यांनी शासनाच्या या उपक्रमाचे व लाही संस्थेचे आभार मानले . समारंभ संपल्यावर त्याच ठिकाणी टॅब मिळालेल्या विद्यार्थ्यांना या टॅबविषयी सविस्तर माहिती , त्याची वापराची आचारसंहिता व त्या संदर्भातले सर्व नियम लाहीच्या प्रमुख श्रीमती ऋतिका मॅडम यांनी सर्व र्विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता नववी ते बारावी या इयत्ता मधील विद्यार्थ्यांसमोर हा समारंभ साजरा करण्यात आला . सदर समारंभाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी ऑटोमोबाईल चे प्रदीप पंडित धनगर व मल्टी स्किल चे राहुल गोविंदा परदेशी यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!