भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

जिल्हा बँक संचालिका जनाबाई महाजन अपात्र,सहकार क्षेत्रात खळबळ

रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून निवडून आलेल्या जिल्हा बँक संचालिका जनाबाई गोंडू महाजन या अपात्र झाल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.निवडणूक खर्चाचे विवरण न दिल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले.

नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आ. एकनाथराव खडसे यांच्या पॅनलतर्फे ऐन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन यांच्या पत्नी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. ही लढत अतिशय चुरशीची झाली. यावेळी
धक्कादायक निकाल लागला होता. यात अरूण पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव करून जनाबाई महाजन या विजयी झाल्या होत्या.परंतु निकाल लागल्यापासून साठ दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च देणे आवश्यक असताना मुदत उलटल्यावरही त्यांनी खर्चाचे विवरण दिले नव्हते. या संदर्भात सहकार खात्याकडे माहितीच्या अधिकारात मंदार पाटील यांनी माहिती मागितली होती. त्या नुसार विलास गावडे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना अपात्र ठरविले., त्या मुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.त्या संदर्भात मंदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरची माहिती दिली.पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,सह आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!