भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २४ जानेवारी पासून सावदा येथे

सावदा.ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग जि. प. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षातील ५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डायमंड स्कूल सावदा येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवशी आयोजित केले आहे.

कार्यक्रम यशस्वीते साठी नुकतीच आज दि २१ रोजी डायमंड स्कूल सावदा येथे श्री एजाज शेख (उपशिक्षणाधिकारी जि.प. जळगाव ) यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी श्री जे के पाटील , श्री सुनील वानखेडे , श्री संदीप पाटील , श्री एस.आर.महाजन , श्री एस. एस. वैष्णव , श्री शेख सर ( उर्दू हायस्कूल सावदा) , श्री एस. व्हि. अली आणि परिसरातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले असून दि २४ रोजी उद्घाटन समारंभ असून कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा डॉ पंकज आशिया (मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव) यांच्या शुभहस्ते होईल. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून मा. शे. हारून शे इकबाल (सचिव हाजी इकबाल हुसेन फाऊंडेशन सावदा) हे राहतील.
सदर कार्यक्रमासाठी श्रीमती उषा राणी देवगुने (तहसीलदार रावेर) ,श्रीमती दीपिका कोतवाल (बी. डी. ओ. पं. स.रावेर), श्री जे.के.पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ) यांची प्रमुख उपस्थिती राहील.


तर यशस्वी स्पर्धकांचे पारितोषिक वितरण दि.२५ रोजी मा श्री कैलाश कडलक (उपविभागीय अधिकारी फैजपूर) यांच्या शुभहस्ते आणि मा.डॉ अनिल झोपे (प्राचार्य डायड जळगाव) यांच्या अध्यक्षेखाली केले जाईल. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा डॉ नितीन बच्छाव (माध्य. शिक्षणाधिकारी जळगाव) , मा श्री विकास पाटील (प्राथ.शिक्षणाधिकारी जळगाव) , मा श्री एजाज शेख (उपशिक्षणाधिकारी जळगाव), श्रीमती रागिणी चव्हाण ( उपशिक्षणाधिकारी जळगाव) आणि श्री शैलेश दखने (गटविकास अधिकारी रावेर) यांच्या मार्गदर्शनखाली होत असून मुख्याध्यापक संघटना आणि परिसरातील सर्व शिक्षक आणि जिल्हा विज्ञान मंडळ परिश्रम घेत आहे परिसरातील विज्ञान प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रा योगेश कोष्टी यांनी केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!