भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रुग्णवाहिके अभावी गर्भवती महिलेची घरीच प्रसुती, आरोग्य विभागाची सेवा ठरली फेल

तासखेडा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील कुसुंबे खुर्द येथिल आदिवासी महिला कुरशाद जुम्मा तडवी यांना प्रसुती वेदना होत असल्याने गावातील आशा वर्कर यांनी त्यांना दवाखान्यात घेवून जाण्यास सांगितले, लागलीच त्यांनी १०२ या क्रमांकावरून रुग्णवाहिका मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णवाहिका न आल्याने गावातील सामाजीक कार्यकर्ते तसेच बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच वर्तमान स्थित ग्रामपचायत सदस्य श्री. प्रदिप भिमराव सपकाळे यांनी सुद्धा शासकीय रुग्णवाहीका बोलवण्यासाठी दोन वेळेस १०२ नंबरचा वापर करून सुद्धा रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने. तसेच रुग्णवाहिकेची वाट बघत बराच उशीर झाल्याने सदरिल महीला ही घरिच प्रसुती होवून त्यांनी बाळाला जन्म दिला.

महीला तसेच नवजात बाळाची प्रकृती ठिक आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी गावातील खाजगी डॉक्टराना बोलविले असता त्यांनी नवजात बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता महिलेच्या नातेवाईक तसेच गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात थंडीच्या वातावरणात नवजात बाळासह मोटारसायकलने एक खाजगी दवाखाना गाठला असता त्यांनी बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालयात घेवून जाण्यास सांगितले. लगेचच रावेर ग्रामीण रुग्णालयात आले असता तिथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने तेथिल नर्सने बाळाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यात गर्भवती महिलेला देखिल रक्तत्रास जास्त प्रमाणात होत असल्याने त्यांना व त्यांच्या नवजात बालकाला वैद्यकीय उपचाराची गरज असतांना सुद्धा उपचार मिळेना.

या सर्व प्रकाराला चार तास उलटून सुद्धा वैद्यकीय सुविधा मिळात नसल्याने प्रदिप सपकाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे यांना फोनव्दारे घडलेला प्रकार सांगितला असता. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत गार्भीय न दाखवता उडवाउडवीची उत्तरे देत मि बाहेर असल्याने आपली मदत करू शकत नाही. असे सांगितले. संपूर्ण घटनाक्रम चालू असताना चार तार उलटली मात्र ना रुग्णवाहीका मिळाली ना वैद्यकीय उपचार. सदरिल महिलेला खाजगी रुगवाहीकेने सावदा येथिल ॲपेक्स हॉस्पिटल येथे ॲडमिट केले व सोबत नवजात बाळाला सुद्धा त्याच्या आईजवळ ॲडमिट करण्यात आले आहे. महीला तसेच नवजात बालक यांच्यावरती आतापर्यंत उपचारासाठी हजारो रुपये खर्च झाले असुन उपचार अजून सुरुच आहे. उपचार सुरू ठेवण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठुन हा मोठा चिंत्तेचा विषय महिलेच्या परिवाराला पडला आहे.

सदरिल घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जर प्रसुती वेळेस किंवा उपचाराअभावी महिलेच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण राहील असत? तसेच नवजात बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाला असता तर याचा दोषि कोण राहील असतं ? असा सवाल प्रदिप सपकाळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. शासन बालमृत्यु, मातामृत्यु तसेच प्रसुती यावर करोडो रुपये खर्च करते परंतु गरिब आदिवासी जनतेला मात्र याचा काही एक उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. योजना व लाभार्थी यातील दुवा म्हणजे प्रशासकीय यंत्रना असते. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपुर्वक गरीब आदिवासी गर्भवती महिलांना सुख सुविधे पासुन व वैद्यकीय उपचारापासुन वंचित ठेवण्याचे काम वैद्यकीय अधिकारी करत असल्याचे लक्षात येते. असे प्रदिप सपकाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सदरिल घटना ज्या ठिकाणी घडली त्या गावामंध्ये सुद्धा शासकीय आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच जवळच ३ कि.मी वरती असलेल्या लोहारा या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना सुद्धा पुरेश्या सुख सुविधे अभावी महिलेला घरीच प्रसुतीची वेळ आली . तसेच नवजात बालकाला देखिल शासकीय दवाखान्यात उपचार मिळू शकला नाही ही खुप लाजीरवाणी गोष्ट आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार असणा-या तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे यांच्यावर आठ दिवसात निलंबनाची कारवाई कारावी अन्यथा कोणतीही पूर्व सुचना न देता आपल्या विरोधामध्ये गावकर्‍यांच्या तसेच पिडीत महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने मौजे .कुसुंबे. ता. रावेर येथिल आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकण्यात येईल त्याच पाठोपाठ तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदार असाल . अश्या स्वरूपाचे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार यांना प्रदिप सपकाळे यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!