भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

तत्पर फाउंडेशन तर्फे ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीत व पुरस्कार सोहळा संपन्न

खिर्डी ता रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी येथे सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन तर्फे देशाच्या ‘आझादी का ७५ वा अमृतमहोत्सव’ निमित्त ‘एक शाम देश के नाम’ व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे होते तसेच अतिथी प्रमुख आचार्य माणेकर बाबा शास्त्री, स्वरूपानंद महाराज हे उपस्थित होते.

तसेच प्रमुख मान्यवर म्हणून आचार्य महंत नरेंद्र महाराज, दुर्गादास पाटील,राजू भागवत सवर्णे,दिपक नगरे,सुनील कोंडे,खिर्डी खुर्द बुद्रुक सरपंच मधुकर ठाकूर,निंभोरा सरपंच सचिन महाले,खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील,खिर्डी बुद्रुक चे माजी पोलीस पाटील अरुण पाटील,भारतीय सैनिक भारत चिमणकार,अक्षय कोळी,युवराज सावंत हे उपस्थित होते.

या देशभक्तीपर गीत कार्यक्रमात पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, या कार्यक्रमात भुसावळ येथील सुरसाज आर्केस्ट्रॅ चे मालक विनोद सुरवाडे,यांच्या सह पूर्ण टीम,तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्य,जेष्ठ नागरिक, राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यांना मिळाले पुरस्कार.
नंदकिशोर महाजन तांदलवाड़ी (आदर्श समाज भूषण पुरस्कार), श्रीकांत महाजन तांदलवाडी (आदर्श युवा नेता पुरस्कार), श्रीराम पाटील रावेर (आदर्श यशस्वी उद्योजक पुरस्कार), शशांक पाटील, तांदलवाडी (कार्यक्षम कृषिसेवक पुरस्कार), दिपक पाटील वाघाडी (आदर्श समाजसेवक पुरस्कार),दिनेश पाटील रेभोटा (आदर्श शेतकरिमित्र पुरस्कार), विजय मधुकर पाटील खिर्डी आदर्श शेतकरी पुरस्कार, प्राचार्य .महंत गोविंदराज राजधर बाबा शास्त्री मराठे,सांगवी (आदर्श प्राचार्य पुरस्कार) कविता हरीलाल कोळी कांडवेल (उत्कृष्ट महिला प.स.सभापती पुरस्कार), राजेंद्र तुकाराम बोरसे निभोरा (उत्कृष्ट संगीत कलरत्न पुरस्कार),संतोष महाजन बलवाडी ( सामाजिक सलोखा पुरस्कार),शेख इम्रान शेख कमर खिर्डीखुर्द (आदर्श सामाजिक सहयोग पुरस्कार), उत्कर्ष नेमाडे:- खिर्डी बु॥( आदर्श युवा संगीतकार पुरस्कार),गणेश धुमाळ (उत्कृष्ट सहा.पोलीस निरीक्षक) या सर्व मान्यवरांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन तर्फे पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!