खिर्डी – बलवाडी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायत समोर आव्हान!
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथील बलवाडी रस्त्यावर असलेल्या गोडावून जवळील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याचे ढिगारे लागले आहे त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा जीव कासवीस होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आजूबाजूच्या परिसरात घरे,पिण्याच्या पाण्याची टाकी,धान्याचे गोडावून असल्यामुळे येथील नागरिकांना व कामगारांना तसेच नवजात बालकांना गंभीर आजार बळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना ग्रामपंचायत प्रशासन झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.असा आरोप या भागातील ग्रामस्थ करीत आहे.हे घाणीचे साम्राज्य दूर करण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायती समोर उभे आहे.
मोकाट प्राणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील प्लॅस्टिक खावून आजारी पडत आहे.तसेच ऐन वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेलाच कचरा अस्ताव्यस्त पसरला असल्याने या ठिकाणी जणू काही कचरा संकलन डेपो ग्राम पंचायत प्रशासनाने तयार केला की काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.तसेच या ठिकाणी वाहनचालकांना साईड द्यावी कशी असा पेच निर्माण होत असतो.यामुळे काही अपघात झाल्यास वाहन चालकाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.सदरील कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.