भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

“आषाढी एकादशी” व “बकरी ईद” दिवशीही सावदा येथील “त्या” हॉटेलवर अवैध देशी-विदेशी दारू सर्रास विक्री

सावदा ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज विशेष प्रतिनिधी । येथील बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील पोलिसचौकीच्या हाकेच्या अंतरावरील रोडवरीलच “त्या” हॉटेल मध्ये आषाढी एकादशी व बकरी ईद सारख्या दिवशी बिनदिक्कत अवैध रित्या कोणताही परवाना नसताना मद्यविक्री सुरू आहे.

आज “आषाढी एकादशी” हा हिंदूंचा पवित्र सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो त्याच प्रमाणे “बकरी ईद” हा सण मुस्लिम बांधव पूर्ण देशात साजरा करतात.या दिवशी अधिकृत लायसन धारी देशी, विदेशी, दारू दुकाने, बियरबर हे या दिवशी बंद असतात, परंतु काही दुकानांवर लपूनछपून दारू विक्री केली जाते, तर विशेष म्हणजे सावदा येथील बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील “त्या” हॉटेल मध्ये अवैध रित्या खुलेआम दारू विकली जाते तेही चढ्या दराने, यात देशी, विदेशी, बियर किंवा लागेल ती दारू या ठिकाणी मिळते विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आणि याबाबत अधिकाऱ्यांना माहिती नसणे म्हणचे येडा होऊन पेढा खाण्यासारखेच आहे.

येथे रोज रात्री दोन वाजे पर्यंत दारू विक्री सुरू असते ,हे फक्त आजच नाही तर इतरही दिवशी रोज येथे अवैध दारू विकली जाते. या हॉटेल वर दारू खरेदी करण्यासाठी लोकांची जत्रा भरलेली असते. हे संबंधित अधिकाऱ्यांना माहिती नसणे म्हणजे नवलच की, सर्वांना याबाबत महिती आहे ,परंतु अर्थपूर्ण संबंधामुळे हप्ते पोहच होत असल्याने या कडे दुर्लक्ष केल जात आहे का? असा प्रश्न नागरिकांन मध्ये सर्वत्र चर्चिला जात आहे. यात खालपासून वर पर्यंत तर आर्थिक रसद पुरवली जात नाही ना ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. याबाबत संबंधी वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असून संबंधीत स्थानिक पोलीस व दारूबंदी अधिकारी यांनी सदरची दारू विक्री कायमची त्वरित बंद करावी अशी मागणी सर्व स्थरातून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!