भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथील नेत्र तपासणी शिबिरात १२७ रुग्णाची तपासणी,”दृष्टी आहे तर सृष्टी आहे” — वैशाली दीदी

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा येथे ओरिजनल पत्रकार संघ व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर १६ नोव्हेंबर बुधवार रोजी घेण्यात आले . या शिबीरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून १२७ रुग्णाची डोळे तपासणी करण्यात येऊन ११ रुग्ण शास्त्रक्रियेस पत्र ठरले .

ओरिजनल पत्रकार संघ सावदा व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर
सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल येथे दि १६ नोव्हेंबर बुधवार रोजी घेण्यात आले, व्यासपीठावर शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक हर होते,तर उदघाटक प्रजापिता ब्राम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या वैशाली दीदी ह्या होत्या ,तर अतिथी सावदा पोलिसस्टेशनचे सपोनि जालिंदर पळे, राजेंद्र चौधरी हे होते.ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे हे होते .

दृष्टी आहे तर सृष्टी आहे, पत्रकार म्हणजे समाजाचा तिसरा डोळा , सावद्यातील ओरिजनल पत्रकार संघ हा समाजकार्यात अग्रेसर आहे,असे विचार प्रजापिता ब्रम्ह कुमारी विद्यालयाच्या वैशाली दीदी यांनी मांडले.

ओरिजनल पत्रकार संघाने घेतलेला हा नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम स्थुत्य असून
असेच कार्यक्रम पत्रकार संघाकडून घडत राहो आशा शुभेच्छा या वेळी प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी दिल्या,

पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो असे सावदा येथील सपोनि जालिंदर पळे यांनी या वेळी सांगितले. यावेळी राजेंद्र चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या शिबीरात १२७ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर यातील ११ शस्त्रक्रीयेस पात्र रूग्णांना जळगाव स्थित कांताई नेत्रालयात शस्त्रक्रीयेकरीता पाठण्यात आले आहे. शिबिरात सावदा परिसरातील सावद्या सह निंभोरा, खिर्डी, रायपूर, रणगाव, तासखेडा, उदळी, खिरोदा, रोझोदा, जानोरी, कोचुर, वाघोदा, चिनावल, मस्कावद आदी गावाहून रुग्ण हजर होते,

यावेळी शिबिरात ओरिजनल पत्रकार संघ सावदा व कांताई नेत्रालय यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसार्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ. ज. कि.शेख, सहायक विनोद पाटील यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली. याचप्रमाणे ओरीजल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव राज चौधरी, सदस्य प्रदीप कुलकर्णी, कविता सकळकळे, संतोष परदेशी, रवींद्र महाजन, अनिल इंगळे, देवेंद्र चौधरी, जगदीश चौधरी, आदी पत्रकार व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन सकळकळे सर यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!