खिर्डी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
खिर्डी, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथे अवैध दारू गुत्त्यांवर भुसावळ येथील विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने ९-११-२२ रोजी खिर्डी येथे छापा टाकून एकूण ३६२०/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
घटनास्थळी अवैध दारू गुत्ता चालक डिगंबर भागवत कोळी,तसेच दारूगुत्त्यावर मद्यसेवन करतांना ज्ञानेश्वर कोचुरे, भास्कर लक्ष्मण कोळी,हे आढळून आले असता त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६८ अ,ब कलम ८४ अन्वये कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने दारुगुत्ता चालकास २५०००/-रू. व मद्यसेवन करणाऱ्यांना प्रत्येकी ३०००/-रू.दंड करण्यात आला.तसेच या पूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मद्यसेवन करणाऱ्यांना ४०००/-रू.असा एकूण ३५०००/- रू.च्या दंडाची शिक्षा सुनावली, सदर कारवाई भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे,दु.निरीक्षक,राजेश सोनार, व सहकाऱ्यांनी केली .