भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेर

रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवकांचा प्रताप, अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र केले सादर

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

रावे, प्रतिनिधी । सोईच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून रावेर तालुक्यातील आठ ग्राम सेवकांनी अपंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आल्याने त्या आठही ग्रामसेवकांना अपंग असल्याचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्या साठी दहा दिवसाचा अल्टीमेटम गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिला आहे. या गंभीर प्रकारा मुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पाहिजे त्या ठिकाणी वा आपल्या सोईच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणुन रावेर तालुक्यातील शामकुमार पाटील, अरविंद कोलते, अनिल वराडे, नितीन महाजन, छाया नेमाडे, विजय पाटील, रवींद्रकुमार चौधरी, राहुल लोखंडे या आठ ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून त्यामुळे खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खडबड उडाली आहे. या आठ ग्रामसेवकांचा प्रताप तालुकाभर गाजतोय त्यामुळे या ग्रामसेवकांना बीडीओ दीपाली कोतवाल यांनी शो कॉज नोटीस दिलेली असून त्यात अपंगत्वाचे मेडिकल बोर्डाचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश या ग्रामसेवकांना दिले आहेत. यासाठी त्यांना १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असल्याने अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या या आठ ही ग्रामसेवकांवर काय कारवाई होते या कडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!