केबल चोरीच्या सततच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल, गौरखेडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ
सावदा, ता रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। सावदा येथुन जवळच असलेल्या रावेर तालुक्यातील गौरखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील ट्युबवेल वायर चोरीचे प्रमाण वाढले असून शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. नेहमीच महिन्या दोन महिन्याआड शेतातून केबल चोऱ्या होत असतात,सततच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गौरखेडा येथील सोपान लक्ष्मण पाटील,चिनावल येथील शेख आसिफ शेख युसुफ ,व शेख इरफान शेख कुतुबुद्दिन या शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर दि १३ रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. शेतातील केबल वायर सोबत पाईप, नळ्या इतर शेती अवजारे ही नेहमीच चोरी जातात. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची ओरड शेतकरी करीत असून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.