भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या ; आधीच लम्पी त्यात सीएमव्ही, शेतकरी उपटून फेकताय आपल्या केळीच्या बागा

मंडे टू मंडे न्युज, रावेर तालुका शेती वृत्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका हा केळी उत्पादनात केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याच रावेर तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. संकटात असणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येथील केळी पिकावर सीएमव्ही नावाचा वायरस आलाय. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.


 
जळगाव जिल्ह्यात ४८ ते ५० हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली जाते. रावेर तालुका हा केळी उत्पादनात जगात अग्रेसर मनाला जातो. या ठिकाणच्या केळीला एक विशिष्ठ प्रकारची चव आहे. त्यामुळे या केळीला जगभर मागणी असते. मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असल्याने या केळी पिकावर जळगावची अर्थ व्यवसथा अवलंबून असल्याचं मानलं जातं, केळीच्या शेतीसाठी बैलांचा वापर करावा लागत असल्याने आणि मोठ्या  प्रमाणात शेणखत लागत असल्याने या भागात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत. मात्र गेल्या महिना भर पासून या भागात जनावरांवर लम्पी आजार पसरल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. तसेच हजारो गुरे बाधित झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता या भागातील मुख्य पीक असलेल्या केळी पिकावर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरसने हल्ला केल्याने हजारो हेक्टर वरील केळी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याचं पाहायला मिळत आहे. 

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा,पातोंडी गावासह
तालुक्यात केळीच्या रोपांवर सीएमव्ही व्हायरस आलाय. सीएमव्ही रोगामुळे शेतकरी केळी पीक उपटून फेकत आहे. कारण एकदा का रोगाची बाधा झाली की ते झाडं अशक्त होते.  त्यात पाहिजे त्या प्रकारची निरोगी फळधारणा होत नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांना ते झाडं उपटून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अखेर आपली संपूर्ण केळी बाग उपटून फेकली. यामध्ये त्यांना उत्पन्न येणे तर दूरच राहिले उलट स्वतच्या खिशातील लाखो रुपये खर्च झाले आहेत. अगोदरचा खर्च वाया गेला, आता पुढे काय लावयचं? त्याला पैसे कुठून आणायचे?  असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. या  रोगवर कोणताही विमा नसल्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून  किमान झालेला खर्च तरी  नुकसान भरपाई द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!