गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला प्रकरण: आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
सावदा,ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा येथील स्वामींनारायण नगर जवळील कत्तलखान्याजवळ गोरक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपा शाहराध्यक्ष सह पाच जण जखमी झाले.या बाबत आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सावदा शहरातील कत्तलखान्या जवळ २८ नोव्हेम्बर च्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास समाजकंटक गो-तस्करांनी गोरक्षक भाजपा शहराध्यक्ष जे के भारंबे सह आणखी तीन ते चार जनांवर तलवार, बंदूक,लोखंडी राळ व लाठ्या- काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या बाबत सावदा पोलिसस्टेशनला ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्या पैकी आतापर्यंत शेख बिलाल शेख अयुब कुरेशी,वय ३३, अशपाक कुरेशी वय ३५, शेख कादीर शेख अयुब कुरेशी,वय २३, शेख साबीर शेख लाल वय ३९, शेख इक्बाल शेख गफ्फार, वय ३६, शेख आबीद शेख लतीफ,वय३०, रमजानखान महेबूब खान ,२६, शेख शाहबाज शेख जमील,वय २५, शेख मुक्तार शेख अरमान,३४, शेख कलीम शेख अयुब,वय ३४ या दहा आरोपींना अटक करण्यात आली त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान आणखी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.