गुर्जर बोली भाषेतील पहिले पुस्तक ; ऐनपुर येथे गुर्जर बोली भाषा साहित्य प्रकाशन सभारंभ
ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी- विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ३ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी ९ वाजता गुर्जर बोलीभाषा साहित्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे संपादक प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने , प्रा. एस . बी. महाजन , प्रा. डॉ. एस. ए . पाटील , प्रा. डॉ. एस .बी. पाटील , व प्रा. एम .के . सोनवणे हे असून हे पुस्तक गुर्जर बोलीभाषेतील पहिले पुस्तक ठरणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन मा. राहुल पाटील ( निवासी उपजिल्हाअधिकारी जळगाव) व डॉ. विनोद पाटील ( कुल सचिव क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भागवत विश्वनाथ पाटील (अध्यक्ष , ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर ) आहेत.तर प्रमुख अतिथी श्रीराम नारायण पाटील( चेअरमन , ऐनपूर. प. शि.प्र.मं.) , रामदास नारायण महाजन (उपअध्यक्ष ऐनपूर प . शि.प्र.मं.) , व संजय वामन पाटील( सचिव , ऐनपूर प. शि. प्र.मं.). डॉ. डी. आर. पाटील (प्राचार्य , आर. सी. पटेल कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूर) , प्रा. डॉ. अरविंद चौधरी( प्राचार्य कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड) हे असतील.
कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. डॉ. जे.बी. अंजने(अध्यक्ष , गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र ऐनपूर व प्राचार्य स. व.प. महाविद्यालय ऐनपूर ) , एन. व्ही. पाटील( उपअध्यक्ष , गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र ऐनपूर व संचालक ऐनपूर प. शि. प्र.मं.) , प्रा. एस.बी. महाजन( समन्वयक , गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र ऐनपूर) ,व संचालक मंडळ ऐनपूर प. शि.प्र. मं सर्व सदस्य गुर्जर बोलीभाषा सहित्य संवर्धन केंद्र ऐनपूर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी स. व.प. कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांनी कळविले आहे.