सावदा येथे १६ नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ओरिजनल पत्रकार संघ सावदा व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्दमाने सावदा येथे जेहरा मरेज हॉल रावेर रोड सावदा. येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त स्री – पुरुष नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून फक्त २०००/- रुपयात इम्पोर्टेड लेन्स सह मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात येईल. ज्या रुग्णांना फेको मशिनद्वारे ऑपरेशन (घडीची लेन्स घालून) करावयाचे असल्यास रु.५०००/- पासून पर्याय उपलब्ध आहेत. डोळ्याची साय काढण्याचे ऑपरेशनसाठी रु.२५००/- आकारले जातील. विशेष म्हणजे शिबिरात उच्च दर्जाच्या अल्कोन इन्फिनीट मशीनद्वारे फेकोसर्जरी शिबिराचे ठिकाणाहून जळगाव स्थित कांताई नेत्रालय आणण्याची व नेण्याची मोफत सुविधा आहे. रुग्णासाठी चहा, नास्ता, जेवण व राहण्याची विनामूल्य सेवा आहे.
शिबिरासाठी सविस्तर माहिती साठी व नाव नोंदणी साठी संपर्क, ओरिजनल पत्रकार संघ, अध्यक्ष – श्री भानुदास भारंबे मो. ९५९५०९१४०३, उपाध्यक्ष- श्री कैलास लवंगडे, मो. ९४०३३८५६१५, सचिव श्री राज चौधरी मो. ९४२३१८९५७२ सदस्य – श्री प्रदीप कुळकर्णी मो. ९४२३९३८६५०, सौ. कविता सकळकळे मो. ९४२०९४२४४४, संतोष परदेशी मो. ९७६५२८०८८५, रविंद्र महाजन मो.९१५६५८५६९९, अनिल इंगळे मो.९७६५१६९११९, देवेंद्र चौधरी मो. ९९७०७०५९२८, श्री जगदीश चौधरी मो. ९३२५५६१६३४. श्री युवराज देसर्डा ९४२३०९१५५९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ओरिजनल पत्रकार संघा तर्फे करण्यात आले आहे.नाव नोंदणी सुरू आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिरात सोबत रेशनकार्ड ची झेरोक्स आणणे बंधनकारक राहील.