खिर्डी येथे वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। खिर्डी येथे गेल्या कित्येक दिवसांपासून रात्रीचे ५ वाजेपासून ते सकाळी ९ या वेळेत कोणत्याही प्रकारचे भारनियमन नसताना ओव्हर लोड चे कारण देवून वीजपुरवठा ऐंनपुर विजकेंद्रातून बंद करण्यात येत असतो.
सध्या रब्बी हंगामाची पेरणी व शेतीकाम जोरात सुरू असल्याने गोरगरीब शेतमजूर महिलांना सकाळी लवकर उठून स्वयंपाक करणे पाणी भरणे, धुणी भांडी घासणे असे कामे अंधारातच करावी लागत असतात त्यातच ऐन सकाळच्या वेळेस ग्राम पंचायत मार्फत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने ऐंनपुर वीज केंद्रातून वीजपुरवठा बंद होताच पाणी पुरवठा कर्मचारी पाणी बंद करून टाकतात वीज ९ वाजेच्या सुमारास आल्यावर पाणी पुरवठा केला जातो सकाळी ७ ते २ या वेळेत शेतमजूर शेतात कामासाठी निघून जात असल्याने शेत मजूर महिलांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही.त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.सध्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या असून अंधाराचा फायदा घेत चोरट्यांना आयतीच संधी उपलब्ध होत आहे.तसेच सर्वांचीच परिस्थिती इन्व्हर्टर किंवा यूपीएस घेण्याची नसल्याने त्यांना अंधाराचा सामना करावा लागतो.
तसेच सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे प्राणी हे अंधारात निपचित पडलेले असतात अश्या परिस्थितीत त्यांच्या अंगावर चुकून पाय पडला किंवा धक्का लागल्यास काही गंभीर प्रसंग उद्भल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका उत्पन होवू शकतो.तसेच काही बरे वाईट झाल्यास जबादार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच दररोज ओव्हर लोडच्या नावाखाली वीज पुरवठा बंद करण्यात येत असून या सर्व नागरिक त्रस्त झाले आहे.तसेच एक आठवडा पूर्णवेळ लाईट सुरळीत पने सुरू राहते आणि एक आठवड्यानंतर पुन्हा ओव्हर रोडच्या नावाखाली लोड शेडींग सुरू करण्यात आले आहे.याकडे संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देवून वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा अशी मागणी खिर्डीसह परिसरातील सुज्ञ नागरिक करीत आहे.