ऐनपुर येथे रेशन दुकानावर बुरशीजन्य धान्य, रेशन दुकान दाराची मनमानी,धान्य वाटपात घोळ?
ऐनपुर,ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे रेशन दुकानदारांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून दुकानातून प्रत्येकी एक किलो धान्य कमी दिले जात असून बुरशीजन्य तसेच कोंब आलेले धान्य लाभधारकांना दिले जात आहे.
रेशन दुकानामध्ये दक्षता समिती ने चौकशी करत असतांना असे आढळून आले की रेशन दुकानामध्ये कोणत्याही प्रकारचा भावफलक नाही किंवा स्वस्त धान्य दुकान याचा सुद्धा फलक लावलेला आढळून आला नाही तसेच बीपीएल कार्ड धारकांची संख्या किती, केशरी कार्ड धारकांची संख्या किती, अंत्योदय कार्ड धारकांची संख्या किती हे सुचित करणारे कोणत्याही प्रकारचे फलक दक्षता समितीला आढळून आले नाही. दक्षता समितीने रेशन दुकानदाराची चौकशी करत असताना त्यांना उडवाउडवी ची उत्तरे देण्यात आली.
विशेष म्हणजे शासनाने प्रत्येक व्यक्तीस पाच किलो धान्य निर्धारित केलेले आहे परंतु रेशन दुकानदार चार किलो प्रमाणे वाटप करत आहे असे दक्षता समितीने चौकशी करत असतांना आढळून आले. दक्षता समितीने रेशन दुकानदारांना विचारणा करत असताना की वाटप चार किलो प्रमाणे का करण्यात येत आहे त्यावर रेशन दुकानदाराने असे उत्तर दिले की ,आम्हाला शासनातर्फे एक किलो धान्य कापले जात आहे, त्यामुळे आम्ही चार किलो प्रमाणे वाटप करत आहोत.
धान्य वाटप करत असताना कोणत्याही प्रकारचे बिल पावती का देण्यात येत नाही. अशी विचारणा केली असता रेशन दुकानदारांनी असे उत्तर दिले की आम्हाला शासनाने बिल पावती देण्यात मनाई केलेली आहे . प्रत्येकाच्या घरी जाऊन थम्म घेत आहे. शासन नियमाप्रमाणे असा रेशन एक महिन्यापर्यंत वाटप झाले पाहिजे परंतु ऐनपुर येथे रेशन दुकान दुकानांमध्ये फक्त दोन ते तीन दिवसांपर्यंत रेशन वाटप केले जाते कोणत्याही प्रकारची तक्रार रजिस्टर येथे ठेवण्यात आलेले नाही रेशन धारकांनी आपल्या तक्रारी कोणाकडे करायच्या असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे याकडे तालुका पुरवठा अधिकारी दुर्लक्ष्य करीत असल्याच्या तक्रारी असून यावर तहसीलदार कारवाई करतील काय ?
तसेच रेशन दुकानांमध्ये बुरशीजन्य तसेच कोंब आलेले धान्याचे वाटप केले जात आहे एका प्रकारे रेशन दुकानदार हे सामान्य लोकांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे बुरशीजन्य व कोंब आले निकृष्ट दर्जाचे धान्य खाल्ल्यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे या बाबत रावेर तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी ‘मंडे टू मंडे न्युज’ च्या प्रतिनिधी ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.