ङि. एस . देशमुख विद्यालयात जागतिक आदिवासी दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
तासखेडा.ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथिल शिक्षणाबाबत नावाजलेले डि.एस . देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ९ ऑगस्ट हा जागतिक अदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्खता: विध्यार्थ्यांची भाषणे तसेच थोर महापुरुषांची वेशभुषा साकारलेले विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे आर्कषणाचे केंद्र बिंदु ठरले होते. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, रमाबाई, महात्मा गांधी, जिजामाता, भारत माता, फातीमा शेख यांच्यासह बऱ्याचशा थोर पुरुषांच्या क्रांतीकारकांच्या वेशभुषा साकारण्यात आल्या. भारत देश हा विविधतेने नटलेल्या आहे याचे जीवंत उदाहरण या कार्यक्रमा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी बघायला मिळाले.
कार्यक्रमांचे अध्यक्ष तसेच ङि एस . देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. वैष्णव यांनी सांगितले की मुलांना शिक्षणा सोबत सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमा मधुन थोर महापुरुषांचे तसेच क्रांतीकारकांचे विचार विद्यार्थ्यांच्या बुद्धीला तसेच ध्येयाल अधिक बळकट बनवतात त्यामुळे वेगवेगळ्या विषया वरती कार्यक्रम महाविद्यालयात नेहमी घेतले जातात.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री . मधुकर चौधरी तसेच कारगील युद्धात आपले योगदान देणारे माजी सैनिक श्री. गंगाधर चौधरी थोरगव्हाण व श्री सतिष हरिभाऊ चौधरी राजकमल प्रेस वरणगांव हे होते. पर्यवेक्षक श्री.डी. के. पाटील, श्री. वाय.डी. कोष्टी, श्री.वाय. जे. कुरकुरे, सौ. जयश्री प्रविण चौधरी, श्रीमती. शितल तायडे. वक्ते श्री. एम . के. पाटील हे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमांचे सुंदर असे सुत्र संचालन श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी केले तर आभार जयश्री चौधरी यांनी व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम वाडःमय मंडळातर्फे संपन्न झाला.