महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर रात्री खेळ चाले : चोरट्या वाहतूकीतून पंटरांमार्फत लाखोंची वसुली : अनेकांचे होतात हात ओले !
रावेर, मंडे टू मंडे विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर रावेर बऱ्हाणपूर दरम्यान ओहरलोड मालवाहूगाड्या चोरवड चेकपोस्ट वरून न जाता आड मार्गे चोरी छुपे अवैध मार्गाने खानापूर-नीरुल-पाडले मार्गे विरोदा बहादरपूर या मार्गाने मध्यप्रदेश (MP) ते महाराष्ट्र मध्ये नेहमी दिवस व रात्री ये-जा करत असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली असून या वाहतुकीच्या लपंडावाचा खेळात अनेकांचे खिसे गरम केले जात असून खालपासून वरपर्यंत आर्थिक रसद पँटरांच्या माध्यमातून पोहचवली जाते.
या बाबत मंडे टू मंडे न्युजने आणखी खोलात जाऊन अधिक चौकशी केली असता मिळालेली माहिती अशी की, मालवाहू गाड्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील चोरवड चेकपोस्ट वरून ये-जा करण्याचा मार्ग असून ही ओव्हरलोड वाहने चोरवड वरून न जाता आड मार्गे रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खानापूर- नीरुल-पाडले मार्गे विरोदा बहादरपूर या मार्गाने चोरी छुपे अवैध मार्गाने जात असतात, या अवैध मार्गाने जाणाऱ्या ओव्हरलोड मालवाहू गाड्या शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असून याला अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण मूक संमती असते. हा वाहतुकीचा लपंडावाचा खेळ तेजीत चालू असून अश्या एका दिवसाला सरासरी 100 ते 125 ओव्हर लोड गाड्या या आडमार्गे जातात या सर्व गाड्या राजस्थानच्या, हरियाणा तर काही मध्यप्रदेश च्या असतात, पंटर लोक ह्या गाड्या पास करतात हे पंटर प्रत्येक गाडी मागे १ हजारांपासून ते ३ हजारापर्यंत गाडीचालका कडून घेत असून अश्या दिवसाला लाखो रुपयांची वसुलीची गळगंज कमाई केली जाते, या वसुलीतील हे पंटर संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक गाडी मागे दोनशे ते पाचशे रुपये देत असून येथील पंटरांचा हा रोजचा व्यवसायच बनला असून या द्वारे वसुली रोजची सरासरी दोन लाखापर्यंत केली जात असते या गाड्या काही दिवसां तर काही शक्यतो रात्रीच्या वेळी ये-जा करीत असतात
सदरील गाड्या मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात वाहतूक होत असून या गाड्या पूर्ण ओहरलोड असतात या मुळे खानापूर- नीरुल -पाडले मार्गे विरोदा हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक वेळा या रस्त्यावर ओहरलोड गाड्या रस्त्यात फसून गेलेल्याच्या प्रकार घडले असून रस्ता मोकळा व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी या चिखलात फसलेल्या गाड्या मेहनत करून बाहेर काढण्यास मदत करतात असाच एक प्रकार मंडे टू मंडे च्या कॅमेऱ्यात कैद झाला असून सदरील फोटो मध्ये बघू शकतो. या ओहरलोड गाड्यां चेक होत नसल्याने कुठल्या मालाची वाहतूक केली जाते यांत कुठला माल भरलेला असतो हे सुद्धा कोणाला माहिती नसते, हा अत्यंत गंभीर प्रकारात अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्याने हे काम बिनधास्त चालू असल्याचेही माहिती मिळाली. एकंदरीत अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने यावर काहीही कार्यवाही होत नाही व पंटर लोक बिनधास्त ह्या गाड्या पास करतात, याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे, मात्र अवैध वसुलीचा माध्यमातून मिल बाटके खाँओ या सिद्धांताने सर्व एकदम सुरळीत चालू आहे.
‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
अवैध वाहतुकीकडे ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित कर्मचारी ‘लाभाचे पाट’ वरिष्ठांपर्यंत पोहोचवीत नाही ना, अशी शंका काहींनी उपस्थित केली. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन सुरू असलेला हा वाहतुकीचा लपंडावाचा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी नागरिकांनकडून व्यक्त करण्यात येत आहे.