ऐनपूर येथे अनुसुचितजाती व नव बौद्ध घटकासाठी शासकीय योजना आपल्या दारी
ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। ऐनपुर येथे अनुसुचित जाति व नव बौध्द या घटकासाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे दिनांक /6/10/2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर नागर येथे समाज मंदिर समोर अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीत विविध शासकीय योजनांची माहिती कामी सरपंच अमोल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये मंडल अधिकारी शेलकर अप्पा यांनी विविध योजना महिती दिली श्रावण बाळं योजना,इंदीरा गांधी वृद्धकाळा योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान व रमाई घरकुल योजना ची सविस्तर माहिती दिली तसेच या योजनेचे कोणते निकष आहे व कोणते कागद पत्र लागतील या संपुर्ण माहिती दिली.
वाड्यातील लोकांच्या समस्या काय आहे याची सपुर्ण महिती घेऊन या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशी विविध शासकिय योजनांची माहिती शेलकर अप्पा यांनी दिली या सभेला संरपंच अमोल महाजन ग्राम पंचायत सदस्य .किशोर पाटील, सतिष अवसरमल, बबलु अवसरमल, अनिल कोळी, तलाठी शिरसाठ अप्पा, ग्राम विकास अधिकारी गोसावी अप्पा समाजिक कार्यकर्ते चदु भालेराव,रविंद्र भालेराव, प्रकाश भिल्ल, विजय अवसरमल,अनिल आसेकर, एस कुमार,ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील पुरुष व महिला मोठया प्रमाणात उपस्थीत होते