भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात मुद्रांक व कोर्ट फी तिकिटांची ज्यादा दराने विक्री ……

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): रावेर येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक मनमानी पद्धतीने मूळ किमती पेक्षा ज्यादा दराने मुद्रकांची व कोर्ट फी तिकिटांची विक्री करत असल्याने सर्व सामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो.तसेच सध्या तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने व जमीन जागा खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. दस्त करण्यासाठी विविध किमतीच्या मुद्रांकांची गरज असतेच याचा फायदा घेत संबंधित विक्रेत्यांकडून घेतला जातो.१००रुपये किमतीचा मुद्रांक सरसकट पणे १२०ते १३० रुपयांना विकला जातो. या पेक्षा जास्त किमतीचा मुद्रांक मूळ किमती पेक्षा १००ते१५०रुपये जास्त घेवून विकला जातो.ग्राहकांनी जास्त पैसे देण्यास नकार दिल्यास संबंधित विक्रेते व ग्राहकांना मुद्रांक शिल्लक नसल्याचे सांगून मुद्रांक विकत देत नाही तसेच टंचाई मुळे शासाना कडून वेळेवर मुद्रांक मिळत नसल्याचे कारण दिले जाते.

तसेच विविध प्रकारचे अर्ज व दाखले काढण्या साठी कोर्ट फी तिकिटांची आवश्यकता असते यासाठी लागणारे पाच रु.चे तिकीट सात रु. ला तर दहा रुपये किमतीचे तिकीट १२ रुपयांना विकले जाते ग्राहकांना ना इलाजाने जास्तीचे पैसे मोजून गरजे पोटी मुद्रांक व कोर्ट फी तिकीट घ्यावेच लागते हा सर्व प्रकार संबंधित विभागाला माहिती असून देखील या विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात येत नाही एक प्रकारे पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात आहे. ग्राहकांनी मुद्रांक विकत घेतल्याची पावती ही संबंधित विक्रेत्यांना मागणी केली तर पावती देखील दिली जात नाही.अशी तालुक्यातील नागरिकांची ओरड असून तहसीलदार व दुय्यम निबंधक अधिकारी या प्रकाराची चौकशी करतील का या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मंडे टू मंडे ने टाकलेला प्रकाश झोत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!