गाते परिसरात अवैधधंदे सुरूच? अवैधधंदे कायमस्वरूपी बंद ची मागणी
तासखेडा. ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते येथे मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारची अवैध दारू विक्री होत असल्याचं वृत्त ‘मंडे टू मंडे न्युज’ ने प्रसारीत केलं असता स्थानिक प्रशासनाने या अवैध धंद्यावर कारवाई करत सर्व अवैध धंदे बंद पाडले खरे मात्र लागलीच अवैध धंदे ठिकाण बदलून पूर्ववत पुन्हा सुरळीतपणे सुरु झाले. म्हणजेच झालेली कारवाई ही फोल ठरली? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ग्रामस्थांच्या मते हा प्रकार आतांचाच नसुन ज्या ज्या वेळी अश्या प्रकारची कारवाई होत असते ते फक्त नि फक्त तात्पुरत्या स्वरूपात असते. दिवस उलटला की पहील्या सारखी स्थिती निर्माण होवून जात असते. म्हणजेच रात ‘ गई,बात गई’ प्रमाणे परिस्थिती होत असते.
राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन या अवैध धंद्यावर कायमचा हतोडा का मारत नाही ? का अवैध धंदे चालवणारे व संबंधित विभाग यांच्यात काही चिरीमिरी स्वरूपाचे हितसंबंध तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करीत असून झालेली कारवाई योग्य आहे मात्र यावर कायमचा आळा घालावा अशी येथील नागरिकांची मागाणी आहे.