गुरांची अवैध वाहतुक करणारा ट्रक पकडला : २८ गुरांची सुटका !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवरील चोरवड टोलनाक्यावर बेकायदेशीर पणे गुराचा भरलेला ट्रक गुरे वाहून नेत असताना पकडला त्यात 28 बैल मान, तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
याबाबत अधिक असे, 7 आगस्ट सकाळी 8 वाजेच्या दरम्यान रावेर- ब-हाणपुर दरम्यानच्या चोरवड चेक पोस्ट वर जवळ 5,00,000 रू.किं.चा दहाचाकी ट्रक त्यावर निळ्या रंगाचा फट लावलेला ट्रक क्र.UP 78 BN 7084 ची तपासणी केली असता त्यात 5.60,000 रू.किं.चे सुमारे 3 वर्षाचे लहान शिंगे असलेले पांढऱ्या, कळ्या, विटकरी रंगाचे असे 28 बैल पाय बांधलेल्या अवस्थेत अंगावर घसरडे असलेले आढळून आले,एकूण- अंदाजे किंमत 10,60,000 गुरे असल्याचा सांगीतले. यातील ट्रक चालक 1)मोहम्मद जुनैद मोहमंद भग्गन कुरेशी वय 19, रा. चांदापुर ता. पुखराया जि. कानपुर (उ.प्र.) 2)मुस्तकिम अहमद मुश्ताक कुरेशी, वय 38, रा. चांदापुर ता. पुखराया जि. कानपुर (उ.प्र.) व त्यांचे सोबतचा एक पळुन गेलेला इसम यांनी 28 बैल बेकायदेशीरित्या ताब्यात बाळगून बेकायदेशीर पणे बैलाची वाहतुक करीत होते.
अपुऱ्या जागेत कोंबून त्यांची मान,तोंड दोरिच्या सहाय्याने बांधून समक्ष पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राशिवाय कत्तल करिता वाहतूक करीत असतांना मिळून आले या बाबत रावेर पो स्टे ला
राजाराम देवराम निमसे (आर.टी.ओ.निरीक्षक) चोरवड नाका ता.रावेर यांच्या फीर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून सदर गुरे हे गोशाळा जळगांव येथे पाठविण्यात आले आहे.पोउनि सचिन नवले , पो .नि कैलास नागरे पोलीस स्टेशन रावेर यांच्या मार्गदर्शनातून पुढची कारवाई सुरु आहे