अवैध डिंक तस्करी : रावेर वन विभागाकडून 90 किलो डिंकाचा साठा जप्त
खिर्डी, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर वनविभागाने डिंक तस्करांविरोधात धडक मोहिम उघडली असून 90 किलो डिंक जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री दोन वाहनांवर कारवाई करून सुमारे 53 हजार रुपयांचा 90 किलो डिंक जप्त करण्यात आल्याने डिंक तस्कर धास्तावले आहेत तसेच पिंपरकुड ते निमड्या रस्त्याने अवैध गौण वनउपज (धावडा डिंक) वाहतूक करणार्या दोन दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्यात आला मात्र संशयित वाहन सोडून पसार झाले. दुचाकी (एम.एच.19 डी.सी. 808) व (एम.एच.19 यु. 0178) मधून 90 हजार रुपये किंमतीचा डिंक जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई पहाटे नियतक्षेत्र जिन्सी कक्ष क्रमांकम 10 मध्ये करण्यात आली. अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करताना दुचाकीस्वार मांगीलाल शेरसिंग मेहता (35, रा.धुलकोट, नेपानगर, जि.बर्हाणपूर) यास ताब्यात घेण्यात आली. संशयित दुचाकी (एम. पी. 68 एम.ई.6322) द्वारे 33 हजार 300 रुपये किंमतीचा डिंक वाहतूक करताना आढळून आला. ही कारवाई रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रवींद्र सोनवणे, अरुणा ढेपले, वनरक्षक रमेश भुतेकर, सुधीर पटणे, सविता वाघ, वाहन चालक विनोद पाटील यांच्या पथकाने केली.