रावेर

तापी परिसरात अवैध दारू व्यवसाय जोमात, प्लास्टिक पंन्नी मुळे मुक्या प्राण्यांसह नागरिक कोमात

तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी परिसरात अवैध दारू विक्री व्यवसाय सर्रास सुरू असुन प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. यात गावातील नागरिक सुद्धा त्रस्त झाले असुन वादात पडायचे नको म्हणून अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा विषय टाळत असतात. मात्र हा टाळला जाणारा विषय आता केवळ एका कुटुंबाचा किंव्वा परिसरातील नागरिकांचा राहीला नसुन तर मुक्या प्राण्यांना सुद्धा अड्चणीचा ठरत आहे. कारण दारुच्या इतरत्र पडलेल्या प्लास्टीक पंन्या गुरे ढोरे खात असुन त्याना आरोग्य संबंधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पशुपालक सुद्धा चिंतेत पडला आहे.


ज्या प्रमाणे मोठ मोठ्या कंपन्या आपल्या वस्तूची व्यवस्थित रित्या पॅकिंग करून डिलेवरी देत असतात . नावाजलेल्या दारुच्या बाटल्या कुठेही घेऊन जाण्यास सोईस्कर पडाव्या म्हणुन तशी निर्मिती होत असते. त्याच पद्धतीने हातभट्टी दारु व्यवसायीकांनी सुद्धा मागे न राहता नामी शक्कल लढवून आपल्या ग्राहकांना येण्याच्या त्रास न व्हावा म्हणुन हातभट्टीची दारु पार्सल करण्यासाठी वापरण्यास बंदी असलेल्या प्लॉस्टिक पन्नींचा वापर करून पन्नीमध्ये ग्राहकाला ऑर्डर प्रमाणे १० रु,२० रुपयाची किंवा याहुन अधिक दारु बांधुन इतरत्र पाठवली जात असल्यामुळे अवैध दारुच्या अड्ड्यावरच नव्हे तर गावामध्ये व गावाच्या आजूबाजूला रस्त्याच्या कडेला या दारुच्या खाली पन्यां पडलेल्या दिसत आहे. यामुळे गावाच्या सभोवतालचा परिसर हा अस्वच्छ होवून मुक्या प्राण्यांना याचा त्रास होत आहे.
एकीकडे शासनाने या प्लॉस्टिक पिशवीच्या वापरावर बंदी घातली असताना सुद्धा या अवैध दारू विक्रेत्यांना प्लास्टिक पंन्नी मिळते तरी कुठुन असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावर संबधीत विभागाने योग्य ती कारवाई करून केवळ पन्नींच नव्हे तर अवैधरित्या चालत असलेले दारुचे अड्डे बंद करावे अशी परिसरातील नागरिकांची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!