भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

खिर्डी परिसरात अवैध वृक्षतोड जोमात,महसूल व वनविभागाचे जाणून-बुजून दुर्लक्ष

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी परिसरात हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वृक्षतोड होत असूनही तालुका वन प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी करीत आहे. रस्त्याच्या शेजारी असलेले मोठमोठे वृक्ष विकासाच्या नावाखाली सर्रास पने कापली जात असून शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या करिता शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च केला जातो.या मोहिमेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र सध्या खिर्डी परिसरात दिसत आहे.परंतु अधिकारी व लाकूड तस्करांशी हातमिळवणी करून दिवसाढवळ्या वृक्षतोड केली जात आहे.

या परिसरातील शेत शिवारात सर्वच प्रकारच्या अवैध वृक्षांची तोडणी केली जात असून ही सगळी लाकडे तालुक्यातील व मोठ्या शहरांमधील आरा मशिन साॅ मिल व लाकूड विक्रेत्यांना पुरविले जात असल्याचे वृक्षप्रेमी बोलत आहे.परिसरात लाकूड विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक जण आहे.यातील काही व्यावसायिकांचे अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे वृत्त असून शासन एकीकडे वृक्ष संवर्धन मोहीम राबवते तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते.यामुळे मात्र भविष्यात लाकूड तस्करांच्या अवैध वृक्षतोडीला मोठी होणारी झाडे बळी पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून या बाबत महसूल व वनविभाग या अनभिग्न आहे काय? असा मोठा प्रश्न असून महसूल व वनविभागाच्या संगनमताने तर ही अवैध वृक्ष तोड होत नाही ना?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!