निंभोरा-खिर्डी परिसरात धाब्यांवर देशी-विदेशी दारूची अवैध विक्री ! कोणाच्या आशीर्वादाने?
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज, प्रतिनिधी। निंभोरा -खिर्डी परिसरात आर्थिक चिरीमिरी मुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहे.तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या ढाब्यांवर बेकायदेशीर देशी, विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री होत आहे.तसेच परीसरात ढाबा संस्कृती रुजली असून या धाब्यावर दारूची खुलेआम अवैध विक्री होत असल्याने परिसराचे नाव आता बदनाम होऊ लागले आहे.
तसेच बहुतांश ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अनेक ढाबे असून नागरिक नेहमी रस्त्याने ये-जा करीत असल्याने या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ढाबा चालकांकडे दारू आणि बियर विक्रीचा कुठलाही परवाना नाही तरीही ते बिनधास्त पणे खुलेआम अवैध मद्यविक्री करत असल्याने या बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तसेच स्थानिक पोलीस प्रशासन अवैध दारूविक्री करणाऱ्या ढाब्यांकडे जाणून बुजून डोळेझाक करीत असल्याने व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे.