ऐनपुर येथे अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक…. प्रशासनाचे दुर्लक्ष?
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल ।। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील भगवती मंदिर परिसरात असलेल्या ग्रामपंचायत ऐनपुर यांच्या मालकीच्या बरड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाहतूक केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील ग्रामपंचायत च्या मालकीच्या असलेल्या सुलवाडी रस्त्यावर असलेल्या भगवती मंदिर परिसरात असलेल्या बरड्यांचे जे.सी. बी. व पोकलेन च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते आहे व सुरू असलेल्या उड्डाण पूल रस्ते या ठिकाणी वाहतूक केली जात आहे महिन्यांपासून सुरू असलेल्या या उत्खनन व वाहतूकीवर ऐनपुर येथील तलाठी व ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी यांनी मात्र कानाडोळा केला असल्याचे दिसून येत आहे ऐनपुर येथील बसस्थानक परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल चौक या ठिकाणावरून हे मोठे मोठे डंपर भरून जात आहेत हे ठिकाण भरपूर वर्दळीचे असून या डंपरांकडे सर्वांचे लक्ष असते परंतू ग्रामस्थांन कडून एकच सुर निघतो की याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का?
ग्रामस्थांनी आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे याकडे लक्ष नाही का? तलाठी व मंडळ अधिकारी यांना हे डंपर आजपर्यंत दिसले नाही का? का यांचे समबंधितांशी काही साटेलोटे तर नाही ना? वाहतूक करण्यात येत असलेल्या मुरूम व गिट्टी माती यांची रायल्टी भरली आहे किंवा नाही? ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच व सदस्य हे काही आर्थिक संबंध तर जोपासत नाही ना? असा सुर ऐनपुर च्या ग्रामस्थांमधून निघत आहे