तासखेडा येथे अवैध माती उत्खनन पत्रकाराला शिविगाळ व धक्का बुक्की
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज. विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील तासखेडा परिसरात पाटाला लागून असलेली माती मोठ्या प्रमाणावर जेसीबी द्वारे अवैध उत्खनन होत आहे,या ठिकाणी वृत्तसंकलन करण्यास गेलेल्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देत अवैध उत्खनन करणाऱ्यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेतला.
रावेर तालुक्यातील तासखेडा येथे पाटबंधारे यांच्या पाटाला लागून असलेल्या वीटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबीद्वारे पाटाची माती अवैध प्रकारे उत्खनन करीत असलेले जेसीबी मालक शुभम विकास पाटील रा.तासखेडा ता.रावेर जि.जळगाव यांनी वृत्तांकन करीत असलेले पत्रकार अनिल इंगळे, तासखेडा. मंडे टू मंडे न्यूज चे प्रतिनिधी यांना जाती वाचक शिवीगाळ करून त्यांचेकडील चित्रीकरण करीत असलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी व शिविगाळ करीत धक्काबुक्की केली असून त्यांचे जीवास काही एक बरेवाईट झाल्यास सदर व्यक्ती जबाबदार राहील,लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला.
लघु पाटबंधारे यांच्या असलेलेल्या जमिनीवर अवैधरीत्या माती उत्खनन करण्यात आलेले असून त्याच प्रकारे अशा अवैध माती उत्खनन तसेच अवैध गौणउत्खननाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित जेसीबी मालक यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी व तसा कार्यवाही अहवाल देण्यात यावा.अशा आशयाचे निवेदन पत्रकार संरक्षण समिती ग्रामीण यांनी तहसिलदार रावेर यांना दिले आहे….तूर्त एव्हढेच!