भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तासखेडा येथील अवैध माती उत्खनन कारवाई गुलदस्त्यात?लघुपाटबंधारे व महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह..?

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील तासखेडा येथून लघुपाटबंधारे विभागाचा कालवा (पाट) जात कालव्याच्या संरक्षण भिंतीची माती मोठ्या प्रमाणात जेसीबी मशिंनच्या साह्याने उदळी पासून ते तासखेड्या पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवैधपणे माती उत्खनन करण्यात आले आहे तसेच तासखेड्याच्या पुढेही असे उत्खनन केलेले असून पाटाची संरक्षक भिंत कोरण्यात आली आहे ,लघुपाटबंधारे/महसूल विभागामार्फत कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अगदी खुलेआम मातीची उत्खनन व वाहतूक केली जात आहे.या बाबत तक्रार करण्यात आलेली असून काय कारवाई केली हे अद्याप स्पस्ट झालेली नसून कारवाई गुलदस्त्यात आहे.

या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी हितसंबंधातून तर दुर्लक्ष करीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, पाटाच्या संरक्षण भिंतीच्या मातीचे अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

अवैध माती उत्खनन केले बाबत कारवाई करणेसाठी रावेर तहसीलदार यांना पत्रकार संरक्षण समितीतर्फे २४-१-२३ रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच आज पावेतो महसूल विभागामार्फत संबंधितावर काय कारवाई केली? किंवा कार्यवाही न करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण तर झाली नाही ना? तसेच राजकीय दबाव तर येत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!