खिर्डी येथे दारूबंदी विभागाच्या धाडीत अवैध देशी-विदेशी दारू साठा जप्त…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): खिर्डी येथे घरात ठेवलेला अवैध दारूचा साठा भुसावळ येथील दारू बंदी विभागाच्या पथकाने धाड टाकून जप्त केला आहे.३० डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत ६५ हजार ४४६ रु किमतीचा माल जप्त करण्यात आला असून दारू बंदी विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली.
यात खिर्डी येथे एका घरात ? देशी,विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती दारू बंदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याने विभागीय निरीक्षक आय एन वाघ यांच्या सह त्यांच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली यावेळी दुय्यम अधिकारी के बी. मुळे. के एन बुवा, नंदू पवार ,मधू वाघ,विपुल राजहंस,आदींनी कारवाई केली असून या धाडी मुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.