क्राईमरावेर

खिर्डी परिसरात माती मिश्रित गाळाची अवैध वाहतूक जोमात

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तापी नदी काठावरील गावातून अगदी बिनधास्त पणे भिंगी माती मिश्रित गाळाची ट्रॅक्टर द्वारे अवैध वाहतूक सुरू असून या कडे जाणून बुजून महसूल प्रशासन कानाडोळा करीत आहे.

तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शेती च्या नावाखाली शासनाची मोठी फसवणूक होत असून लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे.याकडे संबंधित प्रशासनाची डोळेझाक होत असल्यामुळे तापी नदी किनाऱ्यावरील गावात शेकडो ट्रॅक्टर चा माध्यमातून कोणत्याही प्रकारचा उत्खनन व वाहतूक परवाना नसतांना जोमात गाळ वाहतूक सुरू आहे.या कडे संबंधित विभागाने लक्ष देवून त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!